प्रोत्साहनपर लाभासाठी 7 सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक@महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

60
चंद्रपूर, दि. 16 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना अंमलात आलेली असून सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या 13 ऑगस्ट 2024 च्या पत्रानुसार, प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या 33356 शेतकऱ्यांसाठी महा-आयटीने 12 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2024 पर्यंत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सदर कालावधीत संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्याबाबतचा एस.एम.एस. संबंधित शेतकऱ्यांना महा-आयटी मार्फत देण्यात आला आहे. तथापी याबाबत संबंधित बँकांनी देखील योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना व्यक्तीश: कळविणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने त्वरीत कार्यवाही करावी. चंद्रपूर जिल्ह्यातील सदर योजनेअंतर्गत पात्र असलेल्या खातेदारांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, या कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.