मूल नगरपालिकेत मुख्याधिकारी दोडे रुजू

35

मूल येथील रिक्त जागेवर नवे मुख्यधिकारी म्हणून संदीप दोडे हे आज मूल येथे रुजू झाले.
तत्कालीन मुख्याधिकारी मुल तहसील कार्यलयातील नायब तहसीलदार यशवंत पवार यांनी मूल नगरपरिषदेमध्ये एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या एक वर्षात त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाची शिस्त प्रशासकीय काम ,शहरातील असलेला कित्येक वर्षापासून असलेले अर्धवट काम,अतिक्रमण,अतिवृष्ठांनी पावसाने केलेले घरांचे नुकसान नागरीकांना लाभ मिळवून देण्यात महत्वाचा वाटा,तसेच विविध संस्कृतीक कार्यक्रमातून प्रबोधन करण्याचे काम, शहरातील फुटपाथ वर असलेले छोटे—छोटे दुकानदारांना पथविक्रेत्यांच्या मध्यमातून बिनविरोध निवडणूक,तसेच ​त्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास दिलेला नाही रमाई आवास योजना,प्रधानमंत्री घरकुल योजना असो,शासकीय विविध योजनांचा लाभ नागरीकांना आयुष्यमान भारत कार्ड, मूल शहरात सुंदर सुंदर साफसफाई करून नकळत योग्य काम केले. अशा विविध कामांनी त्यांनी मूल शहराला एक वेगळी ओळख करून दिली. आपली एक वेगळी ओळख दाखवून गेली; मात्र त्यांच्या नंतर त्यांच्या ठिकाणी नवे मुख्याधिकारी म्हणून संदीप दोडे रुजू झाले आहेत. त्यांच्या कार्याची शैली काय ते कितपत काम करतात, लोकांना त्यांचे काम खरोखर आवडेल की नाही, ही येणारी वेळ सांगणार आहे.