चार दुकाने फोडले : मुल तालुक्यातील चिरोली गावात घटना

56

– पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर 

प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल तालुक्यातील चिरोली गावात चोरांनी धूमकाळ घालत देशी दारू दुकान सह चार दुकान आज मध्यरात्री फोडले. आश्चर्यजनक म्हणजे पोलीस दुरक्षेत्र चौकी हाकेच्या अंतरावर आहे.

मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिरोली गावात २६ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरांनी गावात धूमकाळ घालत आर. आर. ढोरे यांच्या मालकीची देशी दारू दुकानातून ६०० दारू बाटल्या, मंगेश भाऊजी येरमलवार यांच्या चायनीज सेंटर मधुन १००० रुपये व भांडे, सत्यशील प्रभाकर कुंभारे यांचा किराणा दुकान मधुन अंदाजे दहा हजार रुपये, बाजीराव टेंभूर्णे यांचा बी कुमार नाष्टा सेंटर मधुन ५०० रुपये तसेच रवि सोपनकर यांचा कॉम्प्युटर कॅफे चे ताला फोडून चोरीचे प्रयत्न केले.  .

काल चिरोली गावात गोलकर समाज तर्फे कृष्ण जन्माष्टमी निमित्त कार्यक्रम होता.

गावात रेलचेल असताना सुद्धा चोरांनी धाडस दाखवत दुकाने फोडले. आश्चर्यची बाब म्हणजे या दुकानापासून पोलीस दुरक्षेत्र चौकी हाकेच्या अंतरावर आहे.