५० हजारांचा लाभ, आधार लिंक करा@प्रोत्साहन योजनेचा वारसांना लाभ

36

प्रोत्साहन अनुदानाचा लाभ : आता १८ सप्टेंबरपर्यंत डेडलाइन
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन लाभासाठी पात्र ठरलेल्या (व्हीके नंबर प्राप्त) मात्र आधार प्रमाणीकरण नसलेल्या खातेदारांसाठी महाआयटीने सुविधा उपलब्ध केले व यासाठी ७ सप्टेंबर डेडलाइन होती, मात्र काही खातेदारांची प्रक्रिया बाकी असल्याने १८ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने दिलास मिळाला आहे.
या खातेदारांनी तत्काळ आधार लिंकिंग करण्याचे आवाहन मूल तालुका उपनिबंधक यांनी केले आहे. काही शेतकऱ्याचेआधार प्रमाणीकरण बाकी आहे. या सर्व शेतकऱ्यांनी संबंधित एआर कार्यालय किंवा बँकेतून प्राप्त करून सेतू केंद्रांतून
पोर्टलवर प्रमाणीकरण केल्यास त्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान
मिळण्याची शक्यता आहे. नियमित परतफेड करणाऱ्या काही खातेदारांचे आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वीच निधन झाले आहे. अशा खातेदारांची माहिती योजनेच्या प्रणालीतून संगणकीय काढण्यासाठी बँकांना १७ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे.
प्रोत्साहन योजनेचा वारसांना लाभ
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे अशे लाभार्थी अनुदानाला मुकले होते. या प्रकरणात मृत शेतकऱ्याच्या वारसाला आता मदत देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना बँकेत कागदपत्रे सादर करता येणार आहेत.
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांच्या
खात्यातील प्रोत्साहन अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या मृत्यूमुळे अडखळली होती. या संदर्भात मृत शेतकऱ्यांची माहिती संगणकीय प्रणालीतून काढण्याच्या सुविधा बँकांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यासाठी ९ ते १७ सप्टेंबर या कालावधीत बँकांना सुविधा उपलब्ध राहणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांना बँकेकडे आवश्यक ते कागदपत्रे सादर करावे लागणार आहे.
करून मृत शेतकऱ्याच्या वारसाची नोंद संबंधित कर्जखात्यात त्याबाबतची माहिती संगणकीय प्रणालीवर सादर करावी लागणार आहे. १८ ते २६ सप्टेंबरपर्यंत ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. १८ सप्टेंबरपर्यंत लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन तालुका उपनिबंधक यांनी केले आहे.