नोव्हेंबरपासून सातबारा उताऱ्यात होणार बदल

67

सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावरही आईचे नाव लावण्यात येणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.१ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वडिलांचे नाव बंधनकारक नसेल.तसेच यानंतर करण्यात येणाऱ्या फेरफारमध्येही आईचे नाव लावण्यात येणार आहे. विवाहितांना पतीचे किंवा वडिलांचे नाव लावण्याची मुभा देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारला पाठविला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाकडे पाठविला होता. यातील त्रुटींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी एक नोव्हेंबरपासून करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. – सरिता नरके, राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प, भूमी अभिलेख