नवभारत विद्यालय मुल येथे शासकीय रेखा कला परीक्षा संपन्न

58

नवभारत विद्यालय मुल येथे शासकीय रेखा कला परीक्षा संपन्न
———————————-
दि. 25 सप्टेंबर 2024 ते 28 सप्टेंबर 2024 या कालावधीत नवभारत विद्यालय, मूल केन्द्र क्र.119004 येथे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा
घेण्यात आली. त्यामध्ये मूल , पोंभूर्णा, सावली तालुक्यातील एकूण 700 विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षेला बसले. या परीक्षेचे केंद्रप्रमुख श्री.ए.एच.झाडे मुख्याध्यापक तथा प्राचार्य नवभारत विद्यालय,मुल , सहायक केन्द्र प्रमुख म्हणून श्री. भारत सलाम, कलाशिक्षक ,नवभारत विद्यालय,मुल , तसेच सहभागी शाळेतील कलाशिक्षक, शिक्षक श्री.रवींद्र फडतरे सर, कार्तिक नंदुरकर सर,लालजी बावणे सर, योगेश पेंटेवार सर, ऊराडे सर , देवानंद रामटेके सर,घनश्याम मेश्राम सर, प्रणित नमुलवार सर, रविना धोटे मॅडम , सरस्वती गणवीर मॅडम, भोयर सर, चैताली बावने मॅडम इत्यादीनी परीक्षेचे केंद्रप्रमुख श्री.ए.एच.झाडे सर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य नवभारत विद्यालय, मूल यांच्या उपस्थितीत पर्यवेक्षकाचे काम सुव्यवस्थित पार पाडले. तीन दिवस चाललेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेमध्ये डिझाईन ,स्मरण चित्र, स्थिरचित्र, संकल्प चित्र, रेखाचित्र , भूमिती व अक्षरलेखन असे चार पेपर घेण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट चित्र तयार केले.