आदर्श गाव मौजा कोसंबी येथे सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन कार्यक्रम

29

आदर्श गाव मौजा कोसंबी येथे सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.एच राठोड, आदर्श कोसंबी गावचे सरपंच रविंद्र किसन कामडी, उपसरपंच सारिका गेडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका चंदाताई कामडी, तालुका समन्वयक हर्षवर्धन गजभिये, सांडपाणी व्यवस्थापन सल्लागार प्रतिक्षा खोब्रागडे,समुह समन्वयक सचिन येरमलवार, ग्रामपंचायत अधिकारी विपिन वाकडे ,ग्रा.पं.सदस्य मनिष चौधरी, अरुणा वाढई,सुवर्णा कावळे,रोशनी मोहुलै, पोलिस पाटील अर्चना मोहुलै, सामाजिक कार्यकर्ते विनोद कामडी,वेदिका सोनुले शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष ज्ञानेश्वरी चौधरी, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गटलेवार, सहाय्यक शिक्षक रामकृष्ण गिरडकर, विषय शिक्षक युवराज ठाकरे,दत्तु कोसरे, निशा सोनुले, ईश्वर चौधरी, प्रमोद भोयर,अतुल मोहुलै,सौरव मोहुलै, उमाजी पेंदाम,लकु गुरनुले आणि गावातील जेष्ठ, श्रेष्ठ तरुण युवा वर्ग आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
आदर्श गाव कोसंबी चे सरपंच रविंद्र किसन कामडी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात दि.१७ सप्टेबर २०२४ते २आक्टोबर २०२४ या कालावधीत स्वच्छता हि सेवा, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता या अनुषंगाने गावातील प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेला महत्त्व देवुन गाव स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवले पाहिजे आणि सार्वजनिक शौचालयाची प्रत्येकाने नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वच्छता राखली पाहिजे असे मत व्यक्त केले आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत गटलेवार यांनी केले,तर आभार प्रदर्शन रामकृष्ण गिरडकर यांनी केले.