बोरचांदली@वाघ दिसताच शेतकऱ्याची नदीत उडी!

27

वाघोबाचे दर्शन होताच शेतकऱ्याची नदीत उडी! मूल पोलिसांची शोधमोहीम सुरू बोरचांदली येथीलशेतकरी शैलेश प्रभाकर कटकमवार(39) गावालालागून असलेल्याहे उमा नदी काठावर गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांच्यासमोर थेट वाघोबा उभा असल्याचे दिसले. यामुळे ते चांगलेच घाबरले. जीव वाचविण्याच्या आकांताने पळत सुटले व सरळ उमा नदीत उडी घेतली. ही घटना सोमवारी दुपारी २:००च्या सुमारास घडली.
मूल तालुक्यात मागील दोन महिन्यांत वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला. तब्बल सहाजणांचा बळी घेतला, तर एकजण गंभीर जखमीझाला. परिणामी शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे त्या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, यासाठी अनेक राजकीय पक्षांनी मुख्य वनसंरक्षकांकडे मागणी केली. तालुक्यातील जानाळा, चिंरोती परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या टी- ८३ मादी हल्लेखोर वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
असे असले तरी मूल तालुक्यातील मानवावरील होणारे वाघांचे हल्ले थांबायचे नाव घेत नसून मानव वन्यजीव संघर्ष अधिक शिगेला पोहोचत असल्याचे चित्र आहे. या घटनेची माहिती मूल पोलिस स्टेशनला देण्यात आली असून, मूल पोलिसांची चमू त्यांचा नदीपात्रात शोध घेत आहे. मात्र, वृत्त लिहीपर्यंत शैलेशचा कुठेही पत्ता लागला नाही.