पालकांचा कल मराठी शाळेकडे असला पाहिजे – पालकमंत्री नाम. सुधिर मुनगंटीवार

26

सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे पार पडला
आजी माजी विद्यार्थी व पालकांचा भव्य स्नेहमिलन सोहळा

मूल/ तालुका प्रतिनिधी
मराठी आपली मायबोली असुन मराठी भाषेचे महत्व मोठया प्रमाणात आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना इंग्रजी शाळेत न शिकवता मराठी शाळेत शिकविणे आवश्यक आहे. माझे देखील शिक्षण चंद्रपूरच्या ज्युबली या मराठी शाळेत झाले असुन त्याचा मला स्वार्थ अभिमान आहे. त्यामुळे पालकांचा इंग्रजी शाळेचा ओढा मराठी शाळेकडे वळला पाहिजे. मराठीची अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी पालकांचा कल मराठी शाळेकडे असला पाहिजे असे मत राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधिर भाऊ मुनगंटीवार यांनी मूल येथे विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचालित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने आजी माजी विद्यार्थी व पालकांचा भव्य स्नेहमिलन सोहळ्याच्या प्रसंगी पालकांना आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसिंगभाऊ गणवेनवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे पदाधिकारी अशोक कडूकार, छायाताई चौधरी, पदमाकर इंगोले, प्रशांत जगताप, शाळा समितीचे प्रा. मारोतराव पुल्लावार, प्रा. महेश पानसे, उषा शेंडे, सुखदेव चौथाले, लिना बद्देलवार, गणेश मांडवकर, मारोती कोकाटे, प्रशांत बोबाटे, सुवर्णाताई पिपरे, इंदूताई मडावी, उषा थोराक, विद्या बोबाटे शाळेचे मुख्याध्यापक अविनाश जगताप यांचेसह सर्व समितीचे पदाधिकारी व सदस्य आदी मंचावर उपस्थित होते. या सोहळ्याचे औचित्य साधून शाळेतील माता पालकांनी सुरेख स्वागत गीत सादर केले तसेच माजी विद्यार्थी व पालकांच्या वतीने इको पार्क ते भाग्यरेखा सभागृह मूल पर्यंत विक्रमी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .ही बाईक रैली मूल शहरात सर्वांचे लक्ष वेधुन घेणारी ठरली. याप्रसंगी विद्यार्थ्यानी सुंदर नृत्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शाळेच्या वतीने नाम. सुधिर मुनगंटीवार यांचा शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.
तसेच
आजी माजी विद्यार्थ्याना भेटवस्तू व सन्मानचिन्ह देवुन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमारे २५०० पालक व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या निमित्याने पालकांनी व माजी विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. मुनिराज कुथे, प्रस्ताविक मुख्याध्यापक अविनाश जगताप तर उपस्थितांचे आभार पदवीधर शिक्षक राजू गेडाम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक राहुल मुंगमोडे, योगेश पुल्लकवार, कु. रिना मसराम, अजय राऊत, बंडु अल्लीवार, संकेत जाधव, संजय मारकवार आदींनी परिश्रम घेतले.