संजय गांधी निराधार योजनेची 197 प्रकरणे मंजूर

32

दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 1.00 वाजता संजय गांधी निराधार योजना समितीच्या मासिक सभेचे श्रीमती वंदना अगरकाटे रा गडीसूर्ला यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय,मुल येथे आयोजन करण्यात आलेले होते. सदर सभेमध्ये खालील प्रमाणे समितीचे अध्यक्ष/सदस्य यांनी उपस्थित राहून खालील विवरणात दर्शविलेले प्रकरणे मंजूर/नामंजूर करण्यात आले.संजय गांधी निराधार योजना पात्र प्रकरण 78 नामंजूर प्रकरण 0 एकूण प्रकरण 78इंदिरा गांधी विधवा योजना पात्र पात्र प्रकरण 09 नामंजूर प्रकरण 0 एकूण प्रकरण 09
इंदिरा गांधी अपंग योजना पात्र प्रकरण 0श्रावण बाळ योजना 101 पात्र प्रकरण नामंजूर प्रकरण 11 एकूण प्रकरण 112वृध्दापकाळ योजना 09 पात्र नामंजूर प्रकरण 0 एकूण प्रकरण 09एकुण प्रकरणे पात्र प्रकरण 197 नामंजूर प्रकरण 11 एकूण प्रकरण 208
एकूण 208 प्रकरणांपैकी 197 प्रकरणे समितीने मंजूर करून निकाली काढण्यात आले असून नामंजूर प्रकरणाची संख्या 11 आहे.वरील प्रकरणे प्रकरण /नामंजूर करून सभा समाप्त करण्यात आली.या सभेत योजनांबाबत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेत संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष वंदना अगरकाटे यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे सांगत योजनेसंबंधाने काही अडचणी असल्यास तहसील कार्यालयाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी व दलालापासून सावध राहावे, असेही आवाहन केले.सभेला तहसीलदार मृदुला मोरे, नायब तहसीलदार ओंकार ठाकरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य,पूजा डोहणे,राकेश ठाकरे, नामदेव कावळै,मुन्ना कोटगले, पाल, अनूप नेरलवार,संजय गांधी निराधार कर्मचारी,उपस्थित होते.