नागरिकांना स्वच्छताचा कानमंत्र देत फिरतो गौरव
मुल नगरा मधील स्वच्छता दूत गौरव शामकुळे हा मागील ७वर्षांपासून सलग स्वच्छता करून महान कर्मयोगी गाडगेबाबा चा स्वच्छता चा मंत्र तो नागरिकांना देत फिरत असतो. या कार्याची दखल घेत ना. सुधीर मुनगंटीवार, यांनी ५ सायकील भेट दिलेली आहे. त्यावर त्यांनी डस्ट बिन लटकावून गाव गाव फिरून स्वच्छते चा कानमंत्र देत फिरणार आहे. या पूर्वी त्यांनी स्मशानभूमीची साफ सफाई करणे, सोमनाथ परिसराचि सफाई करणे हा त्याचा नित्याचाच भाग झालेला आहे. दि. २ ऑक्टोंबर पासून गावागावात फिरून स्वच्छतेचा मंत्र देण्यासाठी सुरुवात होणार आहे. गौरव करीत असलेल्या कामाला नागरिकां कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.मूल येथील शोध विचार वैध बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी मागील 7 वर्षापासुन स्वच्छता मित्रा टिमच्यागौरव शामकुलेबबलू गेडामस्वप्नील आक्केवारप्रणय दागमवार प्रतिक मुरकुटे माध्यमातुन स्वच्छते महान कार्य त्यांच्या हातुन घडत आहे. रोज दोन तास मित्रांना सोबत घेवुन स्वच्छता करीत असते. समाजसेवक, पदविभुषण बाबा आमटे यांच्या कर्मभुमी असलेल्या सोमनाथ येथे जन्मास आलेल्या गौरवने समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे हे पाऊल उचलले. गेल्या सात वर्षापासुन त्यांनी सोमनाथ येथील धबधब्बा नियमीत वाहत राहावा यासाठी त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. यासोबतच सोमनाथ देवस्थान परिसराचीही स्वच्छता निरंकार करीत आहे, सकाळी सुरू होणारी दिनचर्या 2 तास स्वच्छता केल्याशिवाय पुर्ण करीत नाही, कधी स्मशानभुमीत तर कधी कर्मविर महाविद्यालयाच्या पटांगणावर ते स्वच्छता करत असताना दिसतात. त्याच्या साथीला बबलु गेडाम, स्वप्नील आक्केवार, प्रणय दागमवार, प्रतिक मुरकुटे यांची साथ मिळत आहे. त्यांचे हे कार्य अधिक झपाटयाने वाढावे यासाठी त्यांने मूल नगर पालीकेचे माजी गटनेते मोतीलाल टहलियानी यांना 5 सायकलची मागणी केली, दरम्यान टहलियांनी यांनी जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे स्वच्छतेसाठी सायकल, कचरापेटी, ध्वनी प्रणाली आणि स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य गौरवला स्वच्छता जनजागृती करण्यासाठी देण्याची मागणी केली.
नामदार मुनगंटीवार यांनी महात्मा गांधी जयंतीच्या शुभमुहुर्तावर स्वच्छतेचा संदेश देत जाणजागृती करण्यासाठी 5 सायकल, 5 कचरापेटी, 2 ध्वनी प्रणाली आणि स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य गौरवच्या साधीन करून 29 सप्टेंबर रोजी रितसर शुभारंभ केला. नामदार मुनगंटीवार यांच्याकडुन मिळालेल्या साहित्यामुळे स्वच्छतेचे काम अधिक वेगाने करण्याची उर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया गौरव शामकुळे यांनी दिली.
Home आपला जिल्हा Breaking News ना.सुधीर मुनगंटीवार यांचेकडे शोध विचार वेद बहुउद्देशीय संस्था मुल स्वच्छता मित्र टीम...