मुल समाजसुधारक शिक्षण प्रसारक मंडळ मूलद्वारा संचालित बालविकास प्राथमिक
शाळा मुल येथे आंतरराष्ट्रीयमाहिती अधिकार दिन साजराकरण्यात आला.याप्रसंगी अध्यक्षस्थानी
शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता अनिल बुटे, प्रमुख अतिथी पदवीधर शिक्षक संतोष सोनवणे, सचिन बल्लावार व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त शाळेमध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा देशभरात
२००५ पासून लागू करण्यात आला आहे. या कायद्यातील तरतुदी व कार्यपद्धती शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता अनिल बुटे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदवीधर शिक्षक प्रास्ताविक पदवीधर शिक्षक संतोष सोनवणे यांनी केले. तर संचालन व आभार प्रदर्शन मंत्रिमंडळातील विद्यार्थी अथर्व खोब्रागडे याने केले.