वनहक्कधारकांचे पी एम किसान योजनेसाठी तहसील कार्यालय मुल सभागृह पीएम किसान कॅम्प

12

मुल(प्रती)  :- राज्य व केंद्र सरकारच्या योजनेतर्गत शेतकऱ्यांना पीएम किसान योजना लागू करण्यात आली. या
योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाकडून सर्व वनहक्क पट्टे धारक शेतकऱ्यांचे पीएम किसान योजना कॅम्प.दिनांक 3 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता  तहसील कार्यालय मुल येथे आयोजित करण्यात आहे.

किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात १ डिसेंबर २०१८ पासून राबविण्यास सुरुवात झाली. आता योजनेत बदल करून वनहक्काचे पक्के पट्टे असणान्या शेतकन्यां देखील या योजनेत समावेश केला गेला. त्यांची नोंदणी देखील सुरू झाली आहे.

यापूर्वी शासनाच्या नियमानुसार केवळ खातेदार शेतकरी पी एम किसान योजने साठी पात्र होते.
त्यातून वनहक्कधारक शेतकरयांना वगळण्यात आले होते. परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार वन हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांना सुद्धा पी एम किसान योजनेचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

तरी शासनाच्या पात्र यादीतील वन हक्क धारक पट्टा असल्यास शेतकऱ्यांनी पीएम किसान योजना कॅम्प.दिनांक 3 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता  तहसील कार्यालय मुल येथे आयोजित करण्यात आहे. येथे उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार मुल यांनी केले आहे.