मूल@महसूल विभागाच्या पथकाकडून 2 ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई

38

महसूल विभागाची अवैध वाळू उपश्यावर धडक कारवाई;2 वाहने जप्त

दिनांक 5 आॅक्टज्पोबर Date 5 oct
पहाटे 4.00 वाजताच्या सुमारास 2 ट्रॅक्टर कोसंबी घाटामध्ये अवैध रेती उत्खनन करत असताना आढळून आले असता महसूल विभागाच्या पथकाकडून 2 ट्रॅक्टर वर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे

आज पहाटेच्या कारवाईने वाळू तस्करात खळबळः कोसंबी शिवारातून बेसुमार वाळूचा उपसा
मूल येथील महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आज शनिवारी पहाटे 4 वाजताच्या शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करून 2 वाहने जप्त केली आहेत या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार कुमरे साहेब, तलाठी , यांनी ही कारवाई केली वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केल्याने नागरीकांत समाधान व्यक्त होत आहे आज पहाटेच झालेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे अनेक माध्यमांमध्ये अवैध वाळू उपश्याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खळबडून जागे झालेल्या महसूल खात्याने आता धडक कारवाई सुरू केल्याचे दिसून येत आहे याकडेही महसूल खात्याने लक्ष देऊन धडक कारवाई करावी अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे. मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो म्हणून कायद्याचा धाक न उरलेल्या वाळू उपसा करणाऱ्यांवर जरब बसविणे गरजेचे असून मा. प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी मूलपरिसरातील कोसंबी घाटामध्ये अवैध रेती उत्खनन नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपश्यावर धडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. आजच्या कारवाईमुळे अवैध वाळू करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे एवढे मात्र खरे.!