विविध उपक्रमांनी साजरा केला वन्यजीव सप्ताह

20

समारोहास वनाधिकाऱ्यांची उपस्थिती
मुल : वन्यजीव सप्ताह निमित्त उपक्रम राबविण्यात आले असून यामधे वन्य जीवांचे संरक्षण व वणाचे रक्षण कशा पद्धतीने करायचे याबाबत विभागीय वनाधिकारी चंद्रपूर प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी चीचपल्ली (प्रादेशिक)
प्रियांकावेलमे, यांच्यामार्गदर्शनाखाली उपयुक्त माहिती देण्यात आली. सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम पंडीत दिनदयाल उपाध्याय ईको येथे संपन्न झाला. दि. १ आक्टोंबर ते ७ आक्टोंबर या सप्ताहात चिचपल्ली वनपरिक्षेत्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज वन्यजीव सप्ताह चा शेवटचा दिवस त्या निमित्ताने चिचपल्ली रेंज ऑफिस मधून सर्व वनकर्मचारी यांची चिचपल्ली ते मूल अशी आकर्षकबॅईक रॅली निघाली.
मूल येथील इको पार्क मधुन वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्य यांची संयुक्त रॅली वन्यजीव वाचवण्याचा संदेश देत मूल शहरातुन काढण्यात आली. इको पार्क मूल येथे समारोपीय कार्यक्रमाला क्षेत्र सहाय्यक पी. डी. खनके, क्षेत्र सहाय्यक चवरे, संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, सचिव, मनोज रणदिवे, सर्व वनकर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शना द्वारे करण्यातआली.