मोहित नरेश चौखुंडे याची कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

17

मोहित नरेश चौखुंडे याची कुस्ती स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत आयोजित कुस्ती या क्रीडा प्रकारात शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित नवभारत कनिष्ठ महाविद्यालय एच एस सी व्होकेशनल च्या इलेक्ट्रिकल टेक्नालॉजी मधील मोहीत नरेश चौखुंडे वर्ग १२ या विद्यार्थ्याची राज्य स्तरावर निवड झाली आहे. शालेय शिक्षण विभाग अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये या विद्यार्थ्याने भरघोस यश संपादन केले. त्याने शाळेने नावलौकिक केले आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय ऍड. अनिलराव वैरागडे साहेब, उपाध्यक्ष ऍड. प्रणव वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी सर, सहसचिव ते. क. कापगते साहेब यांनी अभिनंदन केले.त्याच्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. अशोकराव झाडे सर , मार्गदर्शक शिक्षक श्री. गुरूदास चौधरी तसेच सर्व शिक्षक ,प्राध्यापक, आई , वडील यांना जाते.