नवभारत विद्यालय मूल या शाळेने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा- 2 यामध्ये व्दितीय क्रमांक पटकावला

6

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग द्वारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 हे अभियान महाराष्ट्र राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता राबविण्यात आले. या अभियानात शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय मुल ही माजी खासदार स्व . वि तु नागपुरे साहेब यांनी साकार केलेली संस्था 84 वर्षापासून ग्रामीण, आदिवासी, शेतकरी, गरीब वर्गातील मुलांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणारी मूल तालुक्यातील पहिली नामांकित सेमी इंग्रजी माध्यमांची शाळा आहेत. मूल तालुक्यामध्ये वर्ग 5 ते 12 पर्यंत सेमी इंग्रजी , विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवणारी नवभारत विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,मुल या शाळेने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शाळेला दोन लाख रू. चे पारितोषिक देऊन गौरव केला जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सेमी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेमध्ये शाळेचा समावेश आहे. परिसरात संस्थेने अनेक शालेय व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना माहिती ,विज्ञाननिष्ठ, पुरोगामी विचार व कौशल युक्त बनविणे, सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे संस्थेचे ध्येय आहे. या ध्येयातून शाळेने अनेक उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, शालेय प्रशासनाचे बळकटीकरण व शैक्षणिक या घटकावर आधारित महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 अभियानात विद्यालयाने सहभाग घेत डिजिटल शाळा, पायाभूत सोयी सुविधा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगती व व्यक्तिमत्व विकास अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,राज्यस्तरावर क्रिडा व कला क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, स्टूडेंट पोर्टल, युडायस प्लस, आधार अध्ययतिकरण, परिसर स्वच्छता,विद्यांजली, भितीचीत्र ,स्वयं पोर्टल, एन एस क्यू एफ अभ्यासक्रम,विज्ञान व भाषा प्रयोगशाळा, आरोग्य तपासणी, आपत्ती व्यवस्थापन, इको क्लब, सखी सावित्री समिती,क्रीडा सुविधा ,आनंददायी साधनसामुग्री, आनंद शनिवार, स्पर्धा परीक्षा ,भाषा विषयावर वाचन अशा अनेक घटकावर उपक्रम केल्यामुळे विद्यालयाने तालुक्यातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या यशाबद्दल शाळेचे संस्था अध्यक्ष ॲड.अनिलराव वैरागडे , उपाध्यक्ष ऍड.प्रणव वैरागडे, सचिव शशिकांत धर्माधिकारी, सहसचिव कापगते साहेब, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. वर्षा पिपरे मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी कुमरे साहेब, केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे यांनी अभिनंदन केले.

सदर अभियानासाठी शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अशोकराव झाडे ,ज्येष्ठ शिक्षक गुरुदास चौधरी, निलेश माथनकर, भारत सलाम, राजु बोढे, वर्षा भांडारकर, प्रा.काटकर, प्रा.पानसे, प्रा.वासाडे,प्रतिमा उमक, विकास मोडक, दिपा गोंगल, माधुरी तलांडे, विजय मेश्राम, विजय निखारे, चैतन्य पुप्पलवार ,सुनील चौधरी, ताराचंद निमसरकर, पुनमचंद वाळके ,लीना सोमलकर ,सचिन आत्राम यांचे विशेष सहकार्य लाभले.