शेतकऱ्याची मुलगी वैशाली झाली एक्साईज कॉन्स्टेबल

38

राजुरा :आई वडीलशेतकरी, कुठल्याही मोठ्या आर्थिक पाठबळ नाही अशा स्थितीत मोठी स्वप्न घेऊन
गोयेगावं सारख्या एका खेड्यातून पुण्यासारख्या शहरात ध्येयवेडी होऊन अभ्यास केला. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली अनेक अपयशांचा सामना केला मात्र जिद्द सोडली नाही शेवटी एम. पी. एस. सी. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली.चारमात्र या संघर्षातून मिळालेले यश पाहण्यासाठी तिला सातत्याने प्रोत्साहन देणारे तिचे दादा आज या जगात नाही याचे शल्य तिला कायम बोचत आहे. ही यशोगाथा आहे एका खेड्यातील तरुणी वैशाली सातपुते हीची. तालुक्यातील एका छोट्याशा गावातील वैशाली सातपुते या तरुणीची संघर्ष गाथा आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. तालुक्यापासून किलोमीटर अंतरावर असलेले गोयेगाव हे छोटेसे गाव आहे. साधारण हजार लोकसंख्या वस्ती असलेले हे गाव. याच गावात १ ली ७वीपर्यत शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर गोयेगांव हायस्कूल पर्यंतचे शिक्षण गोवरी इथे झाले. पुढे ११ वी ते १२वीचे शिक्षण शिवाजी आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज राजुरा इथे घेतले. त्यानंतर बीएससी चे शिक्षण घेण्यासाठी चंद्रपूर येथे सरदार पटेल महाविद्यलयात प्रवेश घेतला. या सर्व परिस्थितीत त्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई, बाबा आणि दादा गणेश सातपुते तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. वैशालीचे दादा गणेश सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. प्रत्येक प्रसंगात तो पाठीशी उभा राहिला मार्गदर्शन करीत राहिला. मात्र दोन महिन्यापूर्वीच आकस्मिक निधन झाले. व माझा आधार कोसळला. मात्र मी हिमतीने सातत्याने प्रयत्न करीत राहिले दादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने ध्येयवेडी होऊन अभ्यास केला. व तिच्या परिश्रमाचे फळ म्हणून तिला पंधरा दिवसांपूर्वी एक्साईज विभागात कॉन्स्टेबल म्हणून नोकरी मिळाली. वैशालीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या दादाचे आकस्मिक निधन झाले तिचे यश बघण्यासाठी या जगात तो नाही याचे शल्य तिला कायम बोचत आहे. वैशालीच्या यशामध्ये तिच्या दादाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तिला स्पर्धा परीक्षेचे तयारी करण्यासाठी पुणे ला पाठवले. तिला टायपिंग क्लासेस लावून दिले. त्यामुळे ती पुण्यासारख्या शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकलीतिच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम तिच्या कुटुंबीयांनी केले. राज्यसेवा, कम्बाईन सरळसेवा अशा भरपूर परीक्षा तिने दिल्या. अनेकदा एक- दोन मार्काने अपयश मिळाले. मात्र जिद्द सोडली नाही सातत्याने मन लावून अभ्यास केला. २०२३ मध्ये भरपूर वर्षानी राज्य उत्पादन शुल्क विभागाची ची जाहिरात आली व ती परीक्षा उत्तीर्ण झाली. नंतर ग्राउंड ची प्रॅक्टिस केली. ग्राउंड साठी खूप मेहनत घेतली. दिवस रात्र एक करुन मेहनत घेत होती. अभ्यासातील सातत्य, चिकाटी व जिह याबळावर तिने यश संपादन केले. तिची नियुक्ती राजुरा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या झालेली आहे. या सर्व खडतर प्रवासात तिचे आई, बाबा, दादा माझ्या सोबत होते त्यामुळेच मला हे यश मिळवता आले अशी प्रतिक्रिया वैशाली हिने बोलताना दिली. (ता. प्र. )