मुल तालुक्यातील तृप्ती गंधेवार KBC मध्ये गेल्याने तालुक्यात कौतुक

49

३०.११.२०२४ बोरचांदली येथील मधुकर येनगंटीवार ह्यांची मुलगी तृप्ती (माई)येनगंटीवार -गंधेवार (तृप्ती पंकज गंधेवार) सध्या पुणे स्थित KBC वर जाण्याचं स्वप्नं ठेवून जवळपास ३वर्ष पासून सातत्याने प्रयत्न केला.आणि हॉटसीट वर पोहचली.नुकतेच प्रसारित झालेल्या २८/११ व २९/११ च्या भागात Sony Tv वर झळकली.लहांनपणापासून शिक्षण मूल शहरातील नवभारत विद्यालय मध्ये घेतली.अभ्यासात अत्यंत हुशार असलेली .एम एस सी पर्यंत शिक्षण घेऊन सध्या गृहिणी आहे.पती पंकज गंधेवार हे व्यवसाय ने पशु वैद्यकीय डॉक्टर असून त्यानेच प्रोत्साहित केले.मोठ्या कंपनी नोकरी करतात.

अत्यंत चाणाक्षपणे खेळत असताना audiance poll च्या चुकीच्या उत्तरामुळे तिला ३लाख २०हजार वर समाधान मानावे लागले..!!
तरी असो आमच्या अंगा खांद्यावर खेळलेली मुलगी छोटी भगिनी कौटुंबिक परिवारातील सदस्य हॉटसीटवर बघण्याचं भाग्य लाभलं ह्याचं सार्थ अभिमान आहे आणि कौतुक आहे.