ज्येष्ठांना मदत वयोश्री योजनेतून@आवश्यक कागदपत्र,अर्ज कुठे कराल?तीन हजार रुपयांची आर्थिक मदत

40

वयोश्री योजनेतून ज्येष्ठांना मदत
उतारवयात सरकारची मदत : लाभासाठी करावा लागणार अर्ज
चंद्रपूर : महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी ६५ वर्षांवरील एकूण १० ते १२ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात कोणत्या ना कोणत्या आजाराचा सामना करावा लागतो. त्यासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमधून तीन हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठांना या योजनेतून मदत मिळाली आहे. ज्यांना लाभ मिळाला नाही, त्या ज्येष्ठांनी संबंधित विभागात अर्ज केल्यास त्यांनाही लाभ मिळू शकतो. राज्यातील ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार अपंगत्व, अशक्तपणा येतो, त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांना काही साहाय्य साधने आणि उपकरणांची आवश्यकता भासते. ही उपकरणे खरेदी करण्यासाठी त्यांना वयोश्री योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येते.
आवश्यक कागदपत्र
■ आधार कार्ड, मतदान
कार्ड, पासपोर्ट
आकाराचे दोन फोटो, राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, स्वयं घोषणापत्र, ओळखपत्र पटवि
ण्यासाठी शासनाची अन्य कागदपत्रे, आधार कार्ड नसल्यास त्याची पावतीही चालेल.
कोणती साधने, उपकरणे खरेदी करता येतात? ■ चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, कंबर बेल्ट
अर्ज कुठे कराल?
■ वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेला कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरता येतो. अर्जदारांनी आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज भरावा.
■ अर्जामध्ये पासपोर्ट साइज फोटोसह संपूर्ण नाव, वय, व्यवसाय, गावाचे नाव, तालुका, जिल्हा आदी माहिती भरावी.
■ मागील तीन वर्षांत कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नाही, याचे घोषणापत्र द्यावे लागेल. अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोइन ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात जमा करावा.