विदर्भातील या जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

47

तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू
रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद
*चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ;
*नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी *

चंद्रपूर दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.
या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी . यांनी केले आहे.

मूलमध्ये भुकंपाचा धक्का!

मूल शहरात आज सकाळी ७-२९ला भुकंपाचा सौम्य धक्का जाणवल्या ची चर्चा नगरातील सर्वात मोठ्या श्रीकृष्ण व्हाटस् अप   गृपवर सुरू झाली असून अनेक जण या भुकंपाची पुष्टी करीत आहेत.

वार्ड नंबर १५,वार्ड नंबर ४आणि अनेक वार्डातील नागरिक यांची पुष्टी करीत असून सगळ्यात जास्त ईको पार्क मधील कॅन्टीन मध्ये हादरा जाणवला.. असे स्पष्ट करीत अचानक कॅन्टीन चे सर्व टीन हालायला लागले आणि धुळ पण उडाली… आवाज पण जोरदार होता…असे उमेश झिरे यांनी सांगितले आहे. 

तर या भुकंपाची व्याप्ती गडचिरोली जिल्ह्यापर्यंत असल्याचे वृत्त हाती येत आहे.

सविस्तर वृत्त …..

*तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू*

*रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद* 

*चंद्रपूर जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के ; 

**नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी* * 