कोसंबी येथे संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती

36

दि.8/12/2024 रोजी आदर्श गाव कोसंबी येथे तेली समाजाच्या वतीने संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ वी जयंती समारोह आणि समाज प्रबोधनाचे मोठ्या आनंदाने, उत्साहानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा.नारायनजी गिरडकर यांच्या हस्ते झाले, तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा रविंद्र किसन कामडी सरपंच कोसंबी हे होते.
संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पूष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबादास गिरडकर माजी उपसरपंच यांनी केले.तसेच सरपंच रविंद्र कामडी यांनी संताजी जगनाडे महाराज यांचे विचार आत्मसात करून समाजाच्या प्रगती, आत्मसन्मान, अस्तित्व, अस्मिता,संरक्षण, शिक्षण, संस्कृती संवर्धनासाठी समाज संघटनेची आवश्यकता आहे आणि तेली समाजात शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढ करता येईल यावर मार्गदर्शन केले. मा.युवराज ठाकरे सर यांनी संत जगनाडे महाराज यांचे विचार आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
सौ चंदाताई विनोद कामडी संचालक कृ.उ.बा.स.मूल यांनी आपल्या भाषणात श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रकाश टाकला. मा.गुरूदास गिरडकर यांनी आपल्या मनोगतात समाजातील युवकांनी चांगले शिक्षण घेवून चांगली नोकरी करून समाज सेवा केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष गुरनुले यांनी केले तर आभार प्रदर्शन विक्की गिरडकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देविदास गिरडकर, सामाजिक कार्यकर्ते विनोद कामडी, पुंडलीक गिरडकर, राजेंद्र गिरडकर, गणेश साठोने, विजय कामडी अनवेश कामडी,यशवंत गिरडकर, भास्कर गिरडकर,भुपतराव कामडी, किसनराव कामडी,गोकुल गिरडकर, सुमित कामडी, आत्माराम गिरडकर, संदीप गिरडकर, विक्रम गिरडकर,लखन गिरडकर, अविष्कार कामडी, सारंग गिरडकर,ओम साई गिरडकर,अमित गिरडकर आणि कोसंबी येथील सर्व गावकरी मंडळी बंधू आणि भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.