मुल: दिव्यांग बांधव दिव्यांग नसून सर्वसामान्यांना लाजवेल असे कार्य त्यांनी करतात. कोणावरही निर्भर न राहता आपली दिनचर्या करीत असून प्रत्येक क्षेत्रात आज ते पुढे आहेत. मात्र दिव्यांग बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळवण्यात करिता त्यांना सामाजिक सहानुभूतीची गरज असल्याचेप्रतिपादन बेंबाळ येथीलसामाजिक कार्यकर्ते किशोरउरकुंडवार यांनी भेजगाव येथीलआयोजित दिव्यांग बांधवांच्यादिव्यांग महोत्सवात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.
दिव्यांग बांधव संघटनेच्या वतीने दिव्यांग सप्ताह निमित्त दिव्यांगांना प्रबोधनाचा कार्यक्रम रविवार दिनांक (८) ला स्थानिक शरद चंद्र पवार विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी सरपंच अखिल गांगरेड्डीवार तर अध्यक्ष म्हणून निलेश पाझारे तर प्रमुख अतिथी म्हणून विवेक डांगे भेजगाव येथील पोलीस पाटील शशिकांत गणवीर, येसगाव येथील पोलीस पाटील राजू कोसरे, अर्चना मालपेटकर, माजी ग्रा.प. सदस्य बंडू गणवीर, शामराव वासेकर आदी मंचावर उपस्थित होते.