मूल ११: कृषि महाविद्यालय मूल येथे *“ फिट इंडिया वीक-२०२४”* कार्यक्रम अंतर्गत दिनांक १० ते १८ डिसेंबर या कालावधी मध्ये विविध उपक्रम / कार्यक्रम जसे योग व ध्यान, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, स्वस्थ राहण्याबाबतची शपथ व देशी खेळ इत्यादि महाविद्यालयात राबविण्यात येत आहे.
दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी *“योग व ध्यान”* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता *डॉ. विष्णुकांत टेकाळे* लाभलेले होते. यांनी सर्वप्रथम सांगितले की, आपला देश विविध क्षेत्रामध्ये जसे तंत्रज्ञान, साधनसामग्री, आर्थिकदृष्ट्या प्रगती पथावर आहे, पण दैनंदिन जीवन जगतांनी सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपली शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे. फिट इंडिया वीक-२०२४ याचा मुख्य उद्देश आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे व देशाच्या
सदर फीट इंडिया कार्यक्रम २०२४ अंतर्गत दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी महाविद्यालयात *निबंध स्पर्धा आयोजित* करण्यात आली व या स्पर्धेचा विषय *“आरोग्य हीच संपत्ती”* हा होता. त्यामध्ये एकूण *५६ विद्यार्थ्यानी सहभाग* नोंदविला होता. या शिवाय महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, स्वस्थ राहण्याबाबतची शपथ व देशी खेळ इत्यादि कार्यक्रम पुढे होणार आहेत. सदर योग व ध्यान कार्यक्रमास *१३० विद्यार्थी व २० प्रध्यापाकवृंद उपस्थित होते.* उपस्थितांचे आभार *प्रा. देवानंद कुसुंबे* यांनी मानले सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता *प्रा. मोहिनी पुनसे* आणि *प्रा. देवानंद कुसुंबे* यांनी मोलाची कामगिरी केली.