आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश अशा लोकांना आधार देणे आहे, ज्यांना स्वतःची उपजीविका चालविणे कठीण झाले आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने काही पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करताना कागदपत्रांची आवश्यकता असते, जसे की आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतींनी भरता येतो.
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर याचा नक्की लाभ घ्या. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी उपयुक्त ठरत आहे. चला तर मग, योजनेचा तपशील आणि अर्ज प्रक्रिया समजून घेऊन त्याचा फायदा करून घेऊया!
संजय गांधी निराधार योजना काय आहे?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना. या योजनेअंतर्गत निराधार पुरुष आणि महिला, अपंग व्यक्ती, विधवा, घटस्फोटित महिला, अनाथ, गंभीर आजारांनी त्रस्त पुरुष व महिला, परितक्त्या महिला, वेश्या व्यवसाय सोडलेल्या महिला आणि तृतीयपंथीय व्यक्तींना मदत केली जाते. अशा लोकांना दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे : Sanjay Gandhi Niradhar Yojana Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदान कार्ड
अर्जदाराचा फोटो
निमशासकीय ओळखपत्र
आरएसबीवाय कार्ड
ड्रायव्हिंग लायसन्स
रहिवाशी प्रमाणपत्र
किमान 15 वर्षापासून राज्याचा रहिवासी
दुर्धर आजाराबाबत जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन)
शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाचा दाखला
उत्पन्नाचा दाखला
दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीमध्ये समावेश असल्याचा साक्षांकित उतारा
वयाचा पुरावा कोणताही एक
शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
निवडणूक मतदार यादी किंवा शिधापत्रिकेमध्ये नमूद केलेला वयाचा उतारा
ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या जन्मा नोंदवहीतील प्रत
ग्रामीण नागरी दवाखान्याच्या वैद्यकीय अधीक्षक यांचा किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या वयाचा दाखला.
संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया : Sanjay Gandhi Niradhar Yojana Apply
ज्या व्यक्तीला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीला आपल्या जवळील जिल्हा कार्यालयात, तहसीलदार कार्यालयात जाऊन संजय गांधी निराधार योजनेचे संबंधित अधिकारी आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तुमच्या फॉर्म मध्ये अचूकपणे भरून त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो फॉर्म तुम्हाला त्या संबंधित अधिकाऱ्यांजवळ जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.
संजय गांधी निराधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया : Sanjay Gandhi Niradhar Yojana Apply Online
संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला aaplesarkar.mahaonline.gov.in भेट द्यावी लगेल.
वेबसाईटवर क्लिक केल्यावरती तुमच्या समोर एक होम पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला नवीन युजर नाव नोंदणी दिसेल.
नवीन युजर नोंदणी वर क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती त्यात भरायची आहे. जसे की तुमचे नाव, वडिलांचे नाव, वय, लिंग, व्यवसाय, मोबाईल नंबर, पत्ता, ओळखीचा पुरावा, फोटो इत्यादी
ही सर्व माहिती काळजीपूर्वक भरून झाल्यावर खाली तुम्हाला नोंदणी करा हा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
त्यानंतर आता तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या.
नंतर तुमच्यासमोर संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म उघडेल.
त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
संपूर्ण माहिती भरून झाल्यावरती तुम्ही लिहिलेली माहिती अचूक आहे ना याची खात्री करून सबमिट या बटनवर क्लिक करा.
अशा अगदी सोप्या पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेचा ऑनलाईन फॉर्म पूर्ण करू शकता.