सीडीसीसी बँक हॉल तिकीट@लिपिक आणि शिपाई लेखी परीक्षेसाठी

15

भरती चंद्रपूर जिल्हा बँकेची, पेपर नाशिक अन् नागपूरला
परीक्षार्थ्यांना बसणार आर्थिक फटका

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.ने 15 डिसेंबर 2024 रोजी CDCC बँकेचे हॉल तिकीट त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले. सीडीसीसी बँक भरतीसाठी अर्ज भरणारे उमेदवार सीडीसीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात म्हणजेच https://www.cdccrecruitment.in. अधिकारी 21, 22, 23 डिसेंबर 2024 रोजी CBT मोडद्वारे परीक्षा घेतात. CDCC बँकेचे हॉल तिकीट ऑनलाइन मिळविण्यासाठी खालील प्रक्रिया तपासा.


 चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरतीची ३६० पदांची जाहिरात मागील काही महिन्यांपूर्वी झळकली. यात परीक्षा दिनांक व परीक्षा केंद्र चंद्रपूर असल्याची नोंद होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले.

दरम्यान, २० ते २३ डिसेंबर २०२४ या कालावधीत परीक्षा घोषित करण्यात आली. त्याबाबतचा आलेला संदेश बघून तर परीक्षार्थीचे होश उडाले. कुणाला परीक्षा केंद्र नाशिक, कुणाला नागपूर यासह दूर अंतरावरील केंद्र देण्यात आले. त्यामुळे परीक्षार्थीना आता परीक्षेसाठी नाशिक अन् नागपूरवारी करावी लागणार आहे.
अर्ज भरायला एक हजार, परीक्षेला जायला पाच हजार
बँकेचा अर्ज भरण्यासाठी पाचशे रुपयांचे शुल्क होते. यासोबतच ऑनलाइन अर्ज भरण्याचा खर्च वेगळा असे हजाराच्या जवळपास रुपये परीक्षार्थीचे खर्च झाले. मात्र, आता नाशिकसारखे केंद्र दिल्याने परीक्षेला जाणे-येणे, राहणे, जेवण आदी खर्च पकडून पाच हजारांच्या जवळपासचा भुर्दंड बसणार आहे. पूर्वीच बेरोजगार, त्यातही एका परीक्षेसाठी पाच हजार रुपये खर्च करायचा कसा, असा प्रश्न परीक्षार्थ्यांना पडला आहे.