रेशनकार्डला मोबाईल नंबर लिंक करा!

14

तुमचं रेशन दुसऱ्याने घेतलं तर? म्हणून रेशनकार्डला मोबाईल नंबर लिंक
करा!
आजकाल दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या गोष्टीसाठी मोबाईल नंबरलिंक करणे गरजेचे झाले आहे. ग्रामीण भागासह शहरी भागात मिळत असलेल्या रेशनसाठी देखील मोबाईल नंबर लिंक करणे अनिवार्य झाले आहे. त्याशिवाय दर महिन्याला मिळणारे धान्य मिळण्यास अडचण येईल. त्यामुळे अनेक शिधा पत्रिका धारकाचे मोबाईल नंबर रेशनकार्डलालिंक करण्यात आले आहेत. अशावेळी गैर व्यवहाराला आळा बसण्यास मदत होते आहे.
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत लाभार्थ्यांना रास्त भावात धान्याचे वितरण केले जाते. पॉस मशिनद्वारे धान्याचे वितरण केले जात असले तरी तांत्रिक अडचणी आल्यास ओटीपीचा वापर करून धान्याची उचल लाभार्थ्याला करता येते; परंतु संबंधित लाभार्थ्यांचा मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेशी संलग्न असणे आवश्यक आहे. स्वस्त धान्याचे वितरण करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे धान्य दुकानदारांकडे ग्राहकांकडून अनेक तक्रारीसुद्धा प्राप्त होतात. अशा प्रकारांवर आळा बसावा,

गैरव्यवहाराला बसतेय चाप: शिधापत्रिकेसोबत मोबाइल क्रमांक सीडिंग करणे गरजेचे
दुकानात रेशन आलं, तर मेसेज येणार; तुम्ही मोबाइल नंबर अपडेट केला का?
चंद्रपूर : रेशन दुकानात तुमचे रेशन आले असेल, तर त्याचा मेसेज मिळेल. एवढेच नाही तर रेशन उचलल्यानंतरही मेसेज मिळेल. आपल्या हक्काचे रेशन दुसऱ्या कुण्या व्यक्तीने उचलल्यास त्याचाही मेसेज आपल्या मोबाइलवर येणार आहे. त्यासाठी शिधापत्रिकेशी आधारकार्ड जोडणी, मोबाइल क्रमांक जोडणी करणे आवश्यक आहे.
सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वितरण केले जाते. ई-पॉस मशिनद्वारे रेशन कार्डधारकाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य पुरविले जात असले, तरी तांत्रिक अडचणी आल्यास ओटीपीचा वापर करून धान्याची उचल करता येते. परंतु, संबंधित लाभार्थ्यांचा मोबाइल क्रमांक शिधापत्रिकेशी संलग्न असणे आवश्यक आहे. धान्याचे वितरण करताना स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुकानदारांसंदर्भात ग्राहकांकडून अनेक तक्रारीसुद्धा प्राप्त होतात. त्यामुळे या प्रकारांना आळा बसावा आणि सुरळीत धान्य वितरण व्हावे, म्हणून पॉस मशिनद्वारे धान्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
धान्य
आधारकार्ड जोडणी, मोबाइल क्रमांक जोडणी आदी प्रक्रिया करावी या प्रक्रियेमुळे रेश
यानंतर मोबाइलवर संदे
धान्य घेतले, तरीही येणार एसएमएस
■ एखाद्या कार्डधारकाने स्वस्त धान्याचा लाभ घेण्याकरिता मोबाइल ओटीपी सेवेचा लाभ घेतल्यास त्याच्या मोबाइलवर धान्याची उचल केल्याचा संदेश येतो. त्यामुळे त्याला धान्याच्या उचलबद्दल सर्व माहिती प्राप्त होते. त्यामुळे आधार कार्ड तसेच मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.
मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी काय कराल?
शिधापत्रिकेला मोबाइल क्रमांक जोडण्यासाठी संबंधित गावातील स्वस्त धान्य दुकानदारांशी संपर्क साधावा, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाशी संपर्क साधून मोबाइल क्रमांक जोडणीसाठी अर्ज करावा.
नंबर अपडेट करायला पैसे लागतात का?
आपला मोबाइल क्रमांक अपडेट करायला पैसे लागत नाहीत. आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन आपला मोबाइल क्रमांक अपडेट करून घ्यावा.