शासकीय योजनांसह कर्ज प्रक्रियांसाठी होणार उपयोग@शेतकऱ्यांना मिळणार ‘फार्मर आयडी’

8

शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच यामध्ये शेतकऱ्याच्या शेताच्या माहितीशी त्याचा आधार क्रमांक जोडावयाचा आहे व प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) द्यावयाचा आहे. हंगामी पिकांचा माहिती संच पूर्ण करतील.तालुक्यात सुरुवात झाली आहे. या फार्मर आयडीचा फायदा शेतकऱ्यांना अनुदान मिळवणे, पीकविमा कर्ज प्रक्रिया यासह इतर कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांची शासकीय कार्यालयांमध्ये चकरा मारण्याचे प्रमाण देखील कमी होणार असून, सतत चौकशीसाठी होणारा खर्च वेळ वाचणार आहे.

लाभ देताना येईल सुलभता…

कृषिक्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरुन ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यास महाराष्ट्र शासनाने १४ सप्टेंबर रोजी मान्यता दिली आहे.

सर्व शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक क्रमांक काढणे अनिवार्य आहे. त्यासाठी आधार लिंक असलेला मोबाईलसोबत असावा, 31 डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी हे क्रमांक काढून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

योजनेचे घटक

शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी कॅपमध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या खाते उताराला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा च त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरीत करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांची वारंवार प्रमाणिकरणाची आवश्यकता राहणार नाही.

असे मिळतील योजनेचे अपेक्षित फायदे

योजनेमुळे पीएम किसान योजनेंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यक त्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल, पीएम किसान योजनेंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट) करुन घेण्यास सहाय्य मिळेल, शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि कृषि इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करुन घेण्यात सुलभता येईल, पिक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल.