एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ 31 मार्च 2021

54

एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मुदतवाढ 31 मार्च 2021
कोरोन्याच्या पाश्र्वभूमीवर रापमचा निर्णय
मूल (प्रमोद मशाखेत्री ):— देण्यात येणा—या विविध प्रवास दर सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बहुतांश सवलतधारकांनी विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक,दिव्यांगांनी अद्याप हे स्मार्ट कार्ड घेतलेले नाही.
एसटी महामंडळातील सवलतीचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या प्रवाशांचे स्मार्ट कार्ड काढण्याचे बाकी होते.त्यांनी या मुदतवाढीमुळे दिलासा मिळाला आहे.एसटी महामंडळाच्या माध्यमातून 27विविध सामाजिक घटकांना 33 टक्कक्यांपासून ते 100 टक्यांपर्यत ते 100 टक्क्ेपर्यंत प्रवासी भाडयात सवलत देते.या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभाथ्र्याना आधार क्रमांकाशी संलग्र स्मार्ट काढण्याची योजना महामंडळाने सुरू केली आहे.त्यानुसार एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगारात ज्येष्ठ नागरीक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शाळा—महाविद्यालयातील विद्यार्थी व इतर सवलतधारकांना स्मार्ट कार्ड ही योजना सुरू करण्यात आली होती. याकरिता 30 नोव्हेंबर 2020 ही अंतिम तारीख देण्यात आली होती.
मात्र,कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्मार्ट कार्ड घेण्यासाठी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका निर्माण झाल्या असल्यामुळे शासनाकडून गर्दी कमी कमी करण्याकरीता विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.कोरोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर सध्या अनेक प्रवाशांना आगारातील स्मार्ट कार्ड घेणे शक्य नसल्याने विद्याथ्र्याची तसेच ज्येष्ठ नागरिक,दिव्यंाग आदी सवलतधारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. एसटी महामंडळाच्या विभागांना यासंदर्भात एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाकरिता सध्याची प्रचलित असलेले ओळखपत्र ग्राहय धरण्यात येऊन प्रवास करण्यास मुभा देण्यात यावी,मात्र 31 मार्च 2021 पासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. स्वातंत्रसैनिक,पत्रकार,राज्य शासनाचे विविध पुरस्कार विजेते,दुर्धर व्याधींनी आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळामार्फत सवलत देण्यात येते.स्मार्ट कार्ड काढण्यास मुदतवाढ मिळाल्याने सवलतधारकांना दिलासा मिळाला आहे.