मूल येथील आधारभूत धान खरेदी केंद्र 8 दिवसापासून बंद शेतकरी संकटात धान व्यापा—यांना विकण्याची वेळ

84

मूल :— तालुक्यातील मूल येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर तब्बल 23 दिवसापासून शेतक—यांचे धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे.आता तर गत 8दिवसापासून धान खरेदी केंद्र बंद पडल्याने शेतकरी संकटात सापडलेला आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून चंद्रपूर जिल्यात धान खरेदी केंन्द्र सुरू होते. आधीच धान खरेदी केंन्द्र उशिराने सुरू झाले. जिल्हा मार्केटिग कार्यालयाच्या दुर्लक्षित धोरणामुळे धान खरेदी केंन्द्र ठप्प झाले. धान खरेदी केंन्द्रात बारदाना,गोदामाचा अभाव आहे.त्यामुळे धान खरेदी ठप्प पडलेली आहे.
मूल तालुका धान उत्पादक असल्यामुळे मुल येथे शासकीय हमीभावाने धान खरेदी केंद्र उघडण्यात आलेले असून सदर केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे उघडण्यात आलेले आहे. सदर केंद्राला चंद्रपूर तालुका सुध्दा जोडण्यात आलेला आहे. सदर केंद्रावर धान विक्री करीता शेतक—यांना माहे नोव्हेंबर 2020 पासून नोंदणी करिता अर्ज सादर करण्यांत आले. आजपर्यंत 1151 अर्ज खरेदी केंद्राला प्राप्त झालेले असून प्राप्त झालेल्या अर्जापैकी फक्त 265 शेतक—यांचे 9724.35 क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे.उर्वरीत 886 शेतक—यांचे अर्ज प्रलंबित आहे.
खरेदी केंद्रावर खरेदी करण्याकरीता जागा उपलब्ध नसल्यामुळे मागील 8 दिवसापासून खरेदी केंन्द्र बंद आहे. त्यामूळे नोंदणी करीता अर्ज सादर करणा—या शेतक—यांना खरेदी केंन्द्र कधी सुरू होणार आणि आमचा धान कधी खरेदी करणार ? अशा प्रकारचे शंका कुशंका निर्माण होवून शासन आम्हची दिशाभूल तर करणार नाही नाही, खरेदी केंद्र तर बंद करणार नाही ना ? असे अनेक प्रश्न शेतक—यांपुढे निर्माण होवून खरेदी केंन्द्र बंद केल्यास धान कुठे विकावा याबाबत शेतकरी संभ्रमास्थेत पडलेला आहे.
खरेदी केंद्रावरील खरेदी करण्यात आलेला शेतमाल तात्काळ उचलून नोंदणी केलेल्या शेतक—यांचा धान त्वरीत खरेदी करण्यात येवून शेतक—यांना दिलासा देण्यात यावा या करीता जिल्हाधिका—यांना तहसिलदार मार्फत निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित नगरसेवक विनोद कामडे,नामदेव वाढई,रूमदेव गोहणे,राजू पाल,वासूदेव लोनबले,आदींनी प्रशासनाला आधारभूत धान खरेदी केंद्राची समस्यांची निवेदना मार्फत माहिती दिली.
सध्या धानमोजणीच्या प्रतिक्षेत शेतकरी ताटकळत आहे. 31मार्च पूर्वी पीक कर्ज शेतक—यांना भरणे अनिवार्य आहे.धानाची विक्री तत्पूर्वी होऊन चुकारे मिळणे अत्यंत आवश्यक आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती कोणती भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.