मूल :- जागतिक महिला दिना निमित्याने कन्नमवार सभागृह मूल येथे न. प. तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मूल तालुक्यातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि यशस्वी महिलाचा त्यांच्या सामाजीक सेवा व योगदानाबाबत आज त्यांचा सन्मान करुण ” मूल गौरव पुरस्कार ” शाल श्रीफळ आणि शिल्ड देण्यात आले. सायकल म्यारोथान प्रणीता धोटे विजेत्याना राशी देऊन सन्मान करण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धा, एकल नूत, एकल अभिनय स्पर्धा घेण्यात आल्या . विजेत्याना राशी देऊन सन्मान करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रातुन सौ. आशताई शेंडे ,वैद्यकीय क्षेत्रातुन डॉ. सायली उज्वल बोकारे, साहित्यिक क्षेतातून सौ. स्मिता बांगडे मूल तालुक्यातील पहिला महिला पत्रकार आणि कला क्षेत्रातुन कु.कुमुदिनी भोयर, अंकिता रामशेट्टीवार याना कला आणि क्रीड़ा क्षेत्रातुन तर शैक्षणिक क्षेतातून राजश्री मुस्तीलवार आणि औद्योगिक क्षेतातून सारिका पुगरे ,रेखाताई येरने, सौ. आशाताई गुप्ता याचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे मूल न. प. चे माजी पाच महिला नगराध्यक्षा सौ. छाया चौधरी,सौ. वनीता बुटले, उषा शेंडे, सौ.सुनीता चौधरी, सौ.रीना थेरकर यांचा पण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उदघाटन म्हणून न. प. अध्यक्षा रत्नमाला भोयर, कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. वंदना आगरघाटे मार्गदर्शिका म्हणून डॉ. पूर्वा तारे होते तर कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजीवनी वागरे आणि प्रभा चौथाले यांनी आभार मानले.