बाहेर विनाकारण फिरणा-यावर मूल प्रशासनाचा वाॅच    काल झालेल्या कारवाई मुळे रस्ते झाले सामसूम

59

बाहेर विनाकारण फिरणा-यावर मूल प्रशासनाचा वाॅच    काल झालेल्या कारवाई मुळे रस्ते झाले सामसूम
कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना

मूल:- तालुक्यात सातत्याने कोरेानाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘बे्क द चेन ‘ अंतर्गत कडक निर्बंध लागूकरण्यात आले असले,तरी नागरिक रस्तांवर फिरत होते. मात्र प्रशासनाने रविवार ला विनाकारण फिरणा-यावरधडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते सामसूम पडल्याचे चित्र दिसत आहे.शासनाच्या निर्देशांचे पालन न करता अनेक नागरिक विनाकारण मोठया प्रमाणात ये-जा करीत आहेत. यावर आळाबसावा म्हणून मूल प्रशासनने सुरू केलेल्या मोहिमेमुळे आता मूल येथील

नागरिकांनी ये-जा कमी झाली आहे.
यावर लाॅकडाऊन असताना विनाकारणाने वारंवार बाहेर फिरणा-यांवर पायबंद घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी  महादेव खेडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन   यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी करण्याची योजना आखली   

रविवारी सकाळी राबविलेल्या या मोहिमेत विनाकारण फिरणा-या 136 जाणांची अॅंटिजन चाचणी करण्यात आली. यातसहा जण बाधित आढळले.बाहेर फिरणा-यांची अॅटीजन तपासणी करण्याची योजना आखली
या मोहिमेत तहसिलदार डाॅ.रवींन्द्र होळी,पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत,गटविकास अधिकारी डाॅ.मयूर कळसे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम,नायब तहसिलदार यशवंत पवार आदींनी गांधी चैक व परिसरातील रस्तावर नाकेबंदी केली.

सर्व किराणा दुकाने, भाजी दुकाने, फळांची दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची धान्य दुकाने, (अंडी, मटण, चिकन, मासे व poultry), कृषी संबंधित सर्व सेवा/ दुकाने, पशुखाद्य दुकाने, पावसाळ्याच्या हंगामासाठी साहित्याचे उत्पादन करणारी वैयक्तिक तसेच युनिट (कंपनी) या सेवा सकाळी 7:00 ते सकाळी 11:00 वाजेपर्यंत सुरू राहतील.
तथापि, वरील प्रमाणे दुकाने / आस्थापना द्वारा घरपोच सेवा सकाळी 7:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत सुरू राहतील. असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केलेले आहे